
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो.
गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. तो वाडा एका बाजूने पडलेला होता जरी तो पडलेला असला तरी तो वाडा आमचे लक्ष वेधून आकर्षित करत होता. त्या वाड्याबद्दल आम्ही एका मुलाला विचारले असता त्याने सांगितले की हा वाडा खूप पूर्वीचा आहे. जो अनेक दशकांपासून पडून होता. रात्री तेथे विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे त्याने सांगितले.
तेवढ्यातच पुढे गेल्यावर हॉटेल जवळ झाडाखाली पाणी प्यायला म्हणून थांबलो. झाडाच्या पाऱ्यावरती एक आजोबा बसलेले होते. त्यांना त्या वाड्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की हा वाडा एकेकाळी राजघराण्याचा होता. गावातील लोक म्हणायचे की त्या वाड्यात कुणालातरी मारण्यात आलं आणि त्याचं आत्मा तिथे भटकतो.
वाड्यात येणारा प्रत्येकजण त्या शापाचा बळी ठरतो. त्यामुळे आता तो ओसाड आणि भीतीदायक बनला होता. त्याची कहाणी ऐकून सर्वांच्या मनात भिती घर करू लागली होती. दिवस मावळून अंधार पडला होता.
आम्ही घराच्या ओढीने घराकडे निघालो होतो. मनात भिती होतीच तरीपण मनोमन असं वाटत होतं की एकदा वाड्यामध्ये जाऊनच यावं.
“खरंच असं काही असेल का? त्या वाड्यामध्ये” सुमितने उत्साहाने विचारले.
“चला, एकत्र वाड्यात जाऊन पाहूयात. आणि सत्य काय आहे ते बघू!” रवी त्याच्या प्रश्नाला उत्तरला.
आम्ही सगळे घाबरलो, पण त्याचं आव्हान स्वीकारलं. आम्ही मित्रांनी शेवटी वाड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
रात्रीच्या अंधारात रवी, विकी, अर्जुन, मी, आणि सुमीत टॉर्च घेऊन वाड्याकडे निघालो. वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावरच एक भयानक गारवा आमच्या शरीराला जाणवला. तेव्हा आतून एक विचित्र किंकाळी ऐकू आली.
आम्ही काही वेळ एकमेकांकडे बघत उभे राहिलो. तेवढ्यात विकीने मोठ्या लोखंडी दरवाजावर गंजलेलं कुलूप पाहिले.
“अरे दरवाज्याला तर कुलूप आहे आत मध्ये कसं जायचं.” विकी सगळ्यांना म्हणाला.
आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत शांतपणे पाच मिनिट तिथेच उभा राहिलो.
“आत जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा असा दुसरा कोणता मार्ग वाड्याच्या आजूबाजूने सापडतोय का ते पाहायचं का आपण” रवी सगळ्यांना म्हणाला.
ठीक आहे असं म्हणून आम्ही सर्वांनी वाड्याला पूर्ण वेडा मारला पण आम्हाला आत जाण्यासारखी खिडकी किंवा दरवाजा असा कोणताच मार्ग मिळाला नाही. आम्ही फिरून दरवाज जवळ येऊन थांबलो. विकीने ते गंजलेलं कुलूप पाहून दरवाजावरती जोरात धक्का मारला.
आणि आम्ही माघारी फिरलो. पण तेवढ्यात अचानकच कुलूप खाली पडलं आणि आवाज करत दरवाजा हळूहळू मागे जाऊ लागला.
“हे हे कसं काय झालं?” अर्जुन घाबरून पुटपुटला.
दरवाजाचा करऽऽऽरर करऽऽऽरर असा आवाज येऊ लागला. दरवाजा उघडताच ती विचीत्र किंचाळी वाढु लागली. आणि त्यासोबतच आतून वेगवेगळ्या पक्षांची कर्कश अशी किलबिलाट ऐकू येऊ लागली.
“थांबा.. नको आत मध्ये नको जायला कशाला मोकळ्यात कुठल्या लफड्यात पडायचे आपण माघारी जाऊयात.” अर्जुन दबक्या आवाजात सगळ्यांना म्हणाला.
शेवटी विकीने हिंमत करून आत मध्ये पाऊल टाकले. त्याच्या पाठीमागे आम्ही पण आत मध्ये गेलो.
वाड्यात प्रवेश करताच आम्हाला जुन्या काळातील राजवाड्याची झलक दिसली. वाड्याच्या भिंतींवर कोरलेल्या वेडसर आकृती आणि लालसर डाग लक्षात येत होते. पाऊल टाकताच एका बाजूला तळघराचा जुना लाकडी जिना दिसला त्याच सोबत तळघरातून येणारा आवाज आमच्या कानात घुमला.
वाड्याच्या भिंती जागोजागी फाटलेल्या होत्या. सगळ्या वाड्याला जाळी आणि धुळ लागली होती.
“कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय,” विकीने हळू आवाजात सांगितलं.
तिथेच धुळीच्या फरशीवर एक जुना काळा पडदा लटकलेला होता. सुमित ने धाडस दाखवून पडदा हटवला. आणि पडदा जोराने डोलायला लागला.
त्या पडद्या आड भिंतीवर एक भुताटकी सावली लपल्याचे सर्वांनी पाहिले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. आणि केस विस्कटलेले होते.
आम्ही पुढे जात होतो. आणि अचानक एका खोलीतून भेसूर हसण्याचा आवाज आला. आवाज थांबण्याआधीच जोराचा वारा आला, ज्याने आमच्या हातातील दिवे फडफडायला लागले आणि टॉर्चही बंद होऊन हातातून खाली पडली.
ती सावली हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागली. आणि अचानक आमच्या अंगावर पडली. आणि सगळे जन सैरावैरा इकडे तिकडे ओरडत पळू लागले.
एवढ्या वेळात त्या वाड्याचा दरवाजा पण बंद झाला होता. अंधार पडल्यामुळे कोण कुठे आहे. काहीही समजत नव्हते.
मग आम्ही हळुहळू एकमेकांना शोधू लागलो. ती सावली आमच्यावर कधी झडप घालेल. आणि आम्हाला कधी काय करेल याचा काही ताळमेळ नव्हता.
आम्ही एका कोपऱ्यात सगळे जमा झालो एकमेकांचा हात धरून तेथे बसलो. कोणाला काहीही सुचत नव्हते. आम्ही सगळे भीतीने पूर्णतः घाबरून गेलो होतो.
“कुणी आहे का?” रवीने ओरडून विचारलं, पण उत्तर आलं फक्त प्रतिध्वनीचं.
आम्हाला आमच्या बाजूला वरती जाण्यासाठी एक जिना दिसला. तिथून बाहेर पडायला रस्ता शोधण्यासाठी आम्ही वरच्या मजल्याकडे निघालो. पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरीवर एका भयंकर आवाजासोबत वेदनादायक ओरड ऐकू येत होती.
पायऱ्यांवरची धूळ आमच्या चेहऱ्यापर्यंत येत होती. आम्ही जसे जसे वरती जात होतो तसा तो आवाज अजून स्पष्ट होऊ लागला होता. एकेकाळी तिथे केलेल्या हत्यांचे भयानक किस्से त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले.
“मला वाटतं आपण परत जावं आणि तोच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करावा.” अर्जुन भीतीने म्हणाला.
पण रवीने थांबायला नकार दिला. तो म्हणाला, ” इथपर्यंत आलोच आहोत तर एकदा वरती जाऊन पाहूया तरी.”
गावात परतल्यानंतरही रवीला आणि विकीला बरेच दिवस त्या रात्रीचे आवाज सतत ऐकू येत राहिले. वाड्यातल्या सावल्या त्यांच्यावर कायमस्वरूपी बसल्याचा भास त्यांना होत राहिला.
मित्रांनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा.
समाप्त…
“लेखक- किरण सांगळे”
इतर कथा