रात्रीचा शापित प्रवास- भयकथा

नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे, ती घटना साधारणतः दहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडली आहे.

माझं मुळ गाव कोल्हापूर. कोल्हापूर मध्येच मी इंजीनियरिंग कम्प्लीट केल, कॉलेज कॅम्पस कडून पुण्याला आयटी कंपनीमध्ये माझी प्लेसमेंट झाली. घरी दोन फोर व्हिलर असल्यामुळे एक फोर व्हीलर घेतली. आणि आई वडीलांच्या सहमतीने जॉब साठी पुण्याला रवाना झालो.

पुण्याला गेल्यानंतर कंपनीच्या जवळच एक रुम बघीतली. आता रूम ते ऑफिस आणि ऑफिस ते रुम हा रोजचा प्रवास सुरू झाला, तेथे नवीन मित्र मंडळी झाली, पेमेंट पण चांगले भेटत होते, सगळं छान चालल होत. आई वडीलांबरोबर माझा रोज फोन व्हायचा, पण तरीही आई वडीलांची व गावातील मित्रांची खूप आठवण येत होती. गावाकडे जायची खूप इच्छा होत होती, पण जाता येत नव्हते कारण सुरुवातीचे सहा महिने सुट्टी घेता येत नाही असे इंटरव्ह्यू मध्येच बॉंड झाले होते.

त्यातच सुरुवातीचे सहा सात महिने कसे निघून गेले काही कळालेच नाही मग मी विचार केला की एक महिन्याची सुट्टी घेऊन गावाकडे जावं सर्वांना एकदा भेटून यावं मी सुट्टीसाठी कंपनीमध्ये अर्ज केला पण मॅनेजरने सांगितले की, यूएसए मधून एका मोठ्या कंपनी चे क्लाइंट त्यांचा प्रोजेक्ट घेऊन आपल्या कंपनीमध्ये येणार आहेत प्रोजेक्ट खूप मोठा आहे, तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीला कसा भेटेल याची तू तुझ्या टीम सोबत पूर्ण तयारी कर, आणि प्रेझेंटेशन पण तुलाच करायचे आहे, माझी सहा सात महिन्याची ग्रोथ पाहून ही जबाबदारी मॅनेजरने माझ्यावरती टाकली.

झालं…. कसे बसे सहा सात महिने सुट्टीची वाट पाहत होतो त्यात अजून एका महिन्याची भर पडली. ठीक आहे म्हटलं, स्वतःची समजूत काढली. आणि प्रेझेंटेशन च्या तयारीला लागलो काही दिवसातच प्रेझेंटेशन झालं तो प्रोजेक्ट पण आमचेच कंपनीला भेटला. आणि फायनली मला सुट्टी भेटली त्यावेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी संध्याकाळी ऑफिस मधून रूमवर आलो झटपट बॅक भरली आणि आईला कॉल करून सांगितलं की मला सुट्टी भेटली मी थोड्या वेळात इथून निघतोय.
आई म्हणाली “अरे बाळा आता नकोस येऊ उद्या सकाळी ये, तुझ्यासोबत पण कोणी नाही आत्ता रात्र व्हायला आली आहे.” पण मी कुठं तिचं ऐकतोय, मी म्हटलं आत्ता कुठे सात वाजलेत रात्री बारा एक वाजेपर्यंत मी घरी पोहोचतोय.

मी गाडी काढली आणि तडक गावाच्या ओढीने घराकडे निघालो मी रूमवरून निघाल्यापासून तिचा फोन अर्ध्या एक तासाला सारखा चालूच होता. आईला खूप काळजी वाटत होती मी तीन साडेतीन तासांचा प्रवास करू जवळपास अर्ध्या रस्त्यावर होतो आणि जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालं…

प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एक मोठा पूल लागला आणि नेमकी त्या पुलावर ती गाडी पंचर झाली, पुलावरतीच गाडी एका बाजूला थांबवली आजूबाजूला पाहिले. तर काहीही दिसत नव्हते दूर दूर पर्यंत अंधार आणि सगळीकडे वनझाडी दिसत होती‌. मला थोडी भीती पण वाटत होती, मी गाडीतून खाली उतरल्यावर जरा बरं वाटलं कारण बाहेर मंद गार वाऱ्याची झुळूक चालली होती.

गावाकडे आल्यासारख वाटत होतं निसर्गाचा आनंद घेत रस्त्याच्या बाजूला जाऊन थोडा हलका झालो तेवढ्यात समोरून एक ट्रक येताना दिसला मी त्या ट्रक ला हात पालवला, त्या ट्रक ड्रायव्हरने माझी गाडी व मला पाहताच त्याने ट्रकचा स्पीड कमी केला आणि येथे जास्त वेळ थांबू नका लवकरात लवकर इथून निघा. ही ओढ्याची जागा धोक्याची आहे. एवढेच सांगून तो तू खूप फास्ट मध्ये निघून गेला. मला भीती वाटायला लागली होती.

मी पट्कन गाडीतली स्टेफनी व इतर सामान काढून टायर काढायला सुरुवात केली टायर काढाताना अचानक खूप जोराचा वारा आल्याच आणि कोणीतरी खांद्यावरती हात ठेवल्यासारखं जाणवलं, मी पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं, मला भास झाला असावा असं वाटलं. आणि मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली. टायर बसून झालाच होता तेवढ्यात पुन्हा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं जाणवलं. व त्याचबरोबर मला एक मनुष्य रुपी सावली दिसली, तेव्हा मी पूर्णतः घाबरलो होतो. मागे पाहिले तर एक स्त्री माझ्या पाठीमागे उभी होती. तिने राखाडी रंगाची साडी घातली होती. तिचे डोळे बाहेर आले होते, नखं फार लांब होती, केस रक्ताने माखले होते, चहेऱ्याची त्वचा सोडून गळायला लागली होती, ओठ अर्धे तुटलेले होते, दातांचे सुळे दिसत होते, तेव्हा मी पूर्णतः घाबरलो होतो. मी हळूच गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडला व पटकन आत मध्ये गेलो.

मी घाबरून पूर्ण घामाने भिजलो होतो. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. ना तेथे कोणी माझ्या मदतीला होते. मी आतूनच मागच्या सीट वरून ड्रायव्हिंग सीट वरती जाऊन बसलो. आणि पटकन इथून निघूया म्हटलं. पण स्टेफनी बाहेर होती. आणि गाडीची चावी पण बाहेरच होती. त्यामुळे मला काय करावं ते काहीच सुचत नव्हतं. एवढ्या वेळात ती स्त्री बाहेर दिसेनाशी झाली होती. मी हळूच गाडीतून खाली उतरलो. इकडे तिकडे पाहत हळूच गाडीची स्टेफनी डिक्कित टाकली. आणि डिकी लॉक करून चावी काढत होतो तेवढ्यात माझ्या पाठीमागून त्या स्त्रीचे दोन्ही हात माझ्या खांद्यावरती होते.
“आता मेलो आता सगळं संपलं” मी मनाशीच पुटपुटलो.
ती स्त्री माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. मी कशी बशी तिथून सुटका केली आणि गाडीत बसलो. ती पण माझे पाटोपाट गाडीच्या दरवाजा जवळ आली. आणि दरवाजा बाहेरून खेचू लागली.

मी एका हाताने दरवाजा आत मधू खेचत गाडी चालू केली. आणि तिथून निघालो. पुन्हा ती दरवाज्यापासून दिसेनासी झाली. मी थोडा शांत झालो. पण घडलेला प्रकार डोक्यातून जात नव्हता. तेवढ्यात आईचा फोन आला.
“किती वेळ झाला फोन करते फोन का उचलत नाहीये तू.” आई मला म्हणाली.
“हो हो… आई मी अर्ध्या रस्त्यात आलो आहे. थोड्या वेळात घरी पोहोचतो.” मी आईला एवढेच बोललो. आणि लगेच फोन ठेवून दिला. झालेल्या प्रकाराबद्दल आईला काहीही सांगितले नाही. त्या स्त्रीने माझ्या पाठीवरती नखाचे ओरबाडे ओढले होते. त्यातून रक्तही येत होते. पण मी कसलाही नाही विचार करता आणि आजूबाजूला लक्ष न देता गाडी चालवू लागलो.

त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी रस्त्यावर एक वळण आले. आणि त्या वळणावर तीच स्त्री रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली पुन्हा मला दिसली. त्यावेळी माझा गाडीवरचा ताबा सुटला. माझी गाडीने त्या स्त्रीला उडवून रस्त्याच्या कडेला एक मोठा दगड होता. त्या दगडावरती जाऊन गाडी आदळली. मला जोरदार मार लागला. मी बेशुद्ध झालो. त्यानंतर काय झालं ते मला काहीच आठवत नाही.

मला शुद्ध आली ती दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्येच. माझ्या डोक्याला थोडा मार लागला होता पण माझ्या पाठीवर एकही ओरबाडा जानवत नव्हता. त्यामुळे माझ्यासोबत हा नक्की काय प्रकार घडला हे मलाही समजत नव्हते. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आई बाबा आणि डॉक्टर होते. आई माझ्याकडे पाहून रडत होती. बाबांनी तिला शांत केलं. दुपारनंतर डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला. हॉस्पिटल मधून आम्ही घरी गेलो. थोडा आराम केला.

त्यानंतर आई-बाबांना तो घडलेला प्रकार सगळ्या सांगितला. ते पण हे ऐकून घाबरले होते. त्यांचाही विश्वास बसत नव्हता. मग आईने माझे दृष्ट काढली. आणि मंदिरातील पुजाऱ्याकडून अंगारा आणून मला लावला. तेव्हा कुठे त्या स्त्रीच्या जाळ्यातून सुटका झाल्यासारखे वाटले. पण हा अनुभव आल्यानंतर त्या रस्त्यावरून मी रात्रीचा कधीच प्रवास केला नाही.

समाप्त…

” लेखक- किरण सांगळे “

इतर कथा

Leave a Comment